कोकणगांव – मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव परिसरात तीन लाखांचा बेवारस गांज्याच्या दोन बेवारस बॅग आढळून आल्याने पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गांज्याने भरलेल्या दोन बॅगा हस्तगत केल्या आहेत. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडच्या लगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या असल्याची माहिती पिंपळगाव पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी गेलेल्या पिंपळगाव पोलीस पथकानी बॅगा उघडून बघितल्या असता बॅगेत एकतीस किलो दोनशे ग्रॅम वजनाचा जवळपास तीन लाख किमतीचा बेवारस गांजा आढळून आल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे.
घटनास्थळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस पाटील तुकाराम पवार, ग्राम विकास अधिकारी अभिजित तुपे, कोतवाल माणिक जाधव, आदी उपस्थित होते. सदर गांज्याच्या बॅगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या आढळल्याने अज्ञात इसम हे सदरील अम्लीमालासह प्रवास करित असावे किंवा रात्री प्रवास करत असतांना त्या पडल्या असाव्या असा कयास वर्तवण्यात येत आहे
याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पिंपळगांव बसवंत पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे, हवालदार एकनाथ पवार व पोलीस नाईक दिपक निकुंभ अधिक तपास करत आहे.