धुळे – धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सुरतकडून धुळयाकडे जाणा-या स्विप्ट गाडीला अोव्हरटेक करणा-या ट्रकने धडक दिल्याने कार पुलावरुन तीस फुट खोल दरीत कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला आहे.
२१ ऑक्टोंबरला याच पुलावरुन खाजगी लक्झरी कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यात पाच जण मृत्यु झाले होते. शुक्रवारी पुन्हा त्याच जागेवर हा अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात दोन पुरुष तर एक महिलेचा मृत्यु झाला असून दोन जण जखमी आहे. अपघात झालेल्या चारचाकी वाहनातील प्रवासी हे राजकोटहून धुळे जिल्ह्यातल्या महिर गावाकडे जात होते. अपघातातील मयत व जखमी हे साक्री तालुक्यातील आहे.