मुंबई – टेलिकॉम युझर्सच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक युझर्स एअरटेल आणि रिलायन्स जीओकडे आहेत. मात्र कॉल क्वालिटीच्या बाबतीत दोन्ही कंपन्या मागे आहेत. या दोन्ही कंपन्यांना मागे टाकत व्होडाफोन आयडिया कंपनीने कॉल क्वॉलिटीमध्ये बाजी मारली आहे.
जानेवारी २०२१ मध्ये ही कंपनी सर्वोत्तम कॉल क्वॉलिटीसाठी नंबर वन ठरली. भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने हा खुलासा केला आहे. आयडियाला व्हॉईस क्वालिटीसाठी जानेवारी २०२१ मध्ये ५ पैकी ४.८ गुण मिळाले आहे. तर व्होडाफोनला ४.२ गुण मिळाले आहे. या यादीत ३.९ गुणांसह रियान्स जीओ आणि एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर बीएसएनएल ३.८ गुणांसह सर्वांत मागे आहे.
ट्रायचा डेटा बहुतांश युझर्सच्या फीडबॅकवर आधारित आहे. त्यात इनडोअर क्वालिटीसाठी व्होडाफोनला ४.२ तर आऊटडोअर क्वालिटीसाठी ४.१ गुण मिळाले आहेत. रिलायन्स जीओला इनडोअर क्वालिटीसाठी ४.० आणि आऊटडोअरसाठी ३.७ रेटींग मिळाले आहे. एअरटेलला इनडोअर क्वालिटीसाठी ३.९ रेटींग मिळाले आहे.
कॉल ड्रॉपमध्ये बीएसएनएल टॉप
व्होडाफोन कॉल ड्रॉपमध्ये जानेवारी २०२१ मध्ये केवळ ४.४६ टक्क्यांवर होते. तर आयडिया ३.६६ टक्क्यांवर. रिलायन्स ७.१७ आणि एअरटेल ६.९६ टक्क्यांवर होते. तर बीएसएनएल सर्वाधिक ११.५५ टक्क्यांनी आघाडीवर होते.