नाशिक – के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्यावतीने पाच दिवसीय शॉर्ट-टर्म प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अखिल भारतीय तांत्रिकी शिक्षा परिषद (ए.आय.सी.टी.ई.)ने हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने तीन टप्प्यात घेण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत यशस्वीपणे पार पडला. प्रशिक्षणाचा विषय होता ‘स्मार्ट ग्रीड मध्ये आयओटी आणि ऍडवान्सड पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अनुप्रयोग – २०२०’. या उद्योन्मुख विषयांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमात देश-विदेशातील एकूण ४५० जण सहभागी झाले. त्यात यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश होता. क का वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्त समीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, विभाग प्रमुख डॉ. बी ई कुशारे, डॉ. रविंद्र मुंजे, डॉ. एम. पी. ठाकरे, प्रा. पी. व्ही. गौतम आदींनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.