थिरूवनंतपुरम (केरळ) – हेअर स्टाईल करण्यासाठी लोक काही न काही नवीन पद्धती शोधत असतात. पण या पद्धती जीवघेण्या ठरू शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का? केरळमधील थिरूवनंतपुरम येथील वेंगनूर मधील एका तरुणाला या पद्धतींमुळे जीव गमवावा लागला. शिवनारायण असे मृत तरुणाचे नाव आहे. डोक्यावर चक्क रॉकेल ओतून हा मुलगा केस सरळ करू पहात होता. पण या प्रयत्नांत केसांना आग लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तशी माहिती पोलिसांनी दिली.
हरतऱ्हेने सुंदर दिसण्याच्या प्रयत्नांत लोकं वाट्टेल ते करायला तयार होतात. हेअर स्टाईल हा त्याचाच एक भाग. नवनवीन स्टाईलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सहज उपलब्ध असतात. तेच बघून असा काहीतरी वेडेपणा करायला सुचतो.
पोलिसांनी सांगितले की, शिवनारायणला सोशल मीडियाचे वेड होते. त्यातूनच हा प्रकार घडला असावा. आग लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेंव्हा त्याच्या घरी केवळ त्याची आजी होती.
https://twitter.com/ANI/status/1374787213393682439