विशाखापट्टणम – टॉलिवूड अभिनेते आणि नेते पवन कल्याण यांचा आगामी वकील साब चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली. चित्रपटाचा ट्रेलर विशाखापट्टणमच्या संगम शरत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली. इतकच नव्हे थिएटरमध्ये प्रवेश करताना चाहते चक्क एकमेकांच्या अंगावर चढले.
हा ट्रेलर सोमवारी (२९ मार्च) सायंकाळी चारला तेलुगू भाषिक राज्यात काही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पवन कल्याण यांचे चाहते दुपारी दोन वाजेपासूनच थिएटरवर पोहोचले आणि तिथं पूजा केली. परिस्थिती नियंणात राहिली नाही. थिएटरच्या काचा फुटल्या. तरीही चाहते न थांबता आतमध्ये घुसले.
पवन कल्याण दोनवर्षांनंतर चित्रपटात कमबॅक करत आहेत. वकील साब हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध पिंक चित्रपटाचा रिमेक आहे. पिंकमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी भूमिका केली होती.
https://twitter.com/ANI/status/1376710765843861506