लासलगांव – केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी ,कामगार, व व्यापारी यांच्या विरोधातील निर्णया विरुद्ध भव्य धरणे आंदोलन २ ऑक्टोबरला लासलगांव येथे सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. सर्व शेतकरी, कामगार,व्यापारी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर, जिल्हा सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर, सुरेश कुमावत, अोबीसी सेलचे अध्यक्ष गुणवंत होळकर, ज्ञानेश्वर पाटील यांनी केले आहे.