नवी दिल्ली ः कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष केंद्र सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत, किमान उत्तीर्ण असणं चालणार असून, याआधीची बारावी परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक असण्याची अट विभागानं सध्या वगळली आहे.
गौतमजी,
प्रथम अभिनंदन ….!!!!
काळासोबत चालण्याचा आपल्या सर्व सहकारी मित्रांचा हा सुंदर प्रवास आगष्ट २०२० ला सुरु होत आहे. आगष्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. आपल्या ‘ india darpan live’ या आंतरजाल प्रणालीवरील दृकश्राव्य प्रणालीचा वापर अत्यंत प्रभावी ठरणार आहेत.आपल्या या अभिनव वाटेवरच्या पहिल्या पावलाला मानाचा मुजरा. आपली ही अभिनव पाउलवाट उद्याचा महामार्ग होणार आहे. आपल्या सर्व सहकारी मित्रांना माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा . लक्ष्मण महाडिक ,पिंपळगाव बसवंत ,नाशिक