नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. ७ जणांना सरकारने सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार जाहिर केले आहेत. त्यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यन, डॉ. बेले मोनाप्पा हेगडे, अमेरिकेेचे दिवंगत नरिंदर सिंग कनापी, दिल्लीचे मौलाना वहिदुद्दीन खान, दिल्लीचेच बी बी लाल आणि ओडिसाचे सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.
दहा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात आसामचे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, गुजरातचे दिवंगत माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आदींचा समावेश आहे. केंद्राने एकूण १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ व्यक्तींचा समावेश आहे. त्यात सिंधुदुर्गचे कळसूत्री बाहुल्या कलाकार परशुराम गंगावणे, समाजसेवक गिरीश प्रभुणे यांचा समावेश आहे.
विजेत्यांची यादी अशी
पद्म श्री पुरस्कारार्थी असे