नवी दिल्ली – देशातील सर्व १२४७ केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशप्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू होत आहे. पालकांना १९ एप्रिल सायंकाळी ७ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. ऑनलाइन अर्जाच्या आधारवर २३ एप्रिलला पहिली मेरिट यादी जाहीर होईल. ३० एप्रिलला दुसरी आणि पाच मेस तिसरी यादी जाहीर होईल. अनारक्षित जागेसाठी ३ ते ५ मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया होईल.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या माहितीनुसार, सर्व केंद्रीय विद्यालयातील पहिलीच्या वर्गातील प्रवेश सरकारच्या विविध श्रेणी आणि आरक्षणाचे नियम आणि मेरिट यादीनुसार होईल. केवीएस आणि मोबाईल अॅपवर पालक प्रवेश अर्ज करू शकतील.
पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचं वय ५ ते ७ वर्षापर्यंत (३१ मार्चपर्यंत) असावं. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहमतीनं वयाच्या अटीत २ वर्षांची सवलत मिळू शकते. केंद्रीय विद्यालयाशिवाय आगामी २०२१ वर्षात प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ३१ मेपर्यंत पूर्ण करावी लागेल. शिक्षणात सर्वांना समान हक्काअंतर्गत प्रवेश आणि अनुसूचित जाती-जमाती तसंच मागासवर्गीयांच्या प्रवेशासाठी पूर्ण अर्ज आले नाही तर दुसरी अधिसूचना जाहीर होऊ शकते.
दुसऱ्या वर्गापासून इतर वर्गांमधील प्रवेश शाळांमधील रिक्त जागांच्या आधारवर होतील. त्यासाठी ८ ते १५ एप्रिलपर्यंत ऑफलाइन अर्ज भरून द्यावा लागेल. जर या वर्गांमध्ये रिक्त जागा असतील, तर संबंधित शाळा १९ एप्रिलला प्रवेशासाठी मेरिट यादी जाहीर करेल. याच आधारवर २० ते २७ एप्रिलपर्यंत पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. सर्व शाळांना मेरिट यादी जाहीर करणं अनिवार्य असेल. यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांग, एकुलती एक मुलगी, संरक्षण आणि केंद्रीय कर्मचार्यांच्या आरक्षणानुसार जागांचं वाटप होईल.