नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (वय ७४) यांचे निधन झाले आहे. येथील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे. लोकशक्ती जनता पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन त्याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत नव्हती. त्यांच्यारुपाने राजकारणातील एक जाणकार नेता हरपला आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे निधन झाल्याने आता चिराग पासवान यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढविली जाणार आहे.