नवी दिल्ली – केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारच्या झालेल्या अपघातामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी व स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
श्रीपाद नाईक पत्नीसह देवदर्शनासाठी गेले होते. सकाळी त्यांनी येलापूर येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनर ते गोकर्ण येथे जाणार होते. . पण, त्याअगोदरच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर आहे.