नवी दिल्ली : सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणाऱ्या सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांची नोकरी पूर्ण झाली (निवृत्ती) असेल, तरीही सरकार त्यांना काम करण्याची आणखी एक संधी देणार आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांना ही नोकरी कंत्राटी तत्त्वावर असेल. या नेमणुका झाल्यानंतर बर्याच कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
लॉकडाऊननंतर अनेक विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना व अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवा देण्याची संधी देण्यात येणार आहे. ज्या पदांवर ही नोकरी दिली जाईल, त्यात सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, संचालक इत्यादी तांत्रिक पदांचा समावेश आहे. निवृत्तीवेळी मिळालेल्या पगारापेक्षा अधिक पगार दिला जाणार नाही. मात्र, या कर्मचाऱ्यांना मानधन व भत्तेही मिळणार आहेत.
आहे. कंत्राटी कामगार वयाच्या ६५ वर्षांपर्यंत काम करू शकतील. त्यांना सेवा देणारे कर्मचारी म्हणून सर्व भत्ते मिळणार नाहीत, परंतु त्यांना कोणत्याही कामासाठी बाहेरगावी पाठवले गेले, तर टीए-डीए दिले जाईल. कार्मिक व प्रशिक्षण विभाग, डीओपीटीने यासंदर्भात सचिवांची समिती गठीत केली आहे. त्याचा आराखडाही तयार करण्यात येत आहे.
असा असेल पगार
एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार निवृत्तीवेळी १ लाख ५५ हजार ९०० रुपये मिळत असेल तर त्याची पेन्शन आता ७७ हजार ९५० रुपये झालेली असेल. त्यामुळे त्याला कंत्राटी पद्धतीच्या नोकरीत ७७ हजार ९५० एवढा पगार (मानधन) मिळेल. हा करार १ वर्षासाठीच असेल. त्यांना इन्क्रीमेंट किंवा महागाई भत्ता मिळणार नाही. गृह भत्ताही दिला जाणार नाही. ते एख ते दीड महिन्याची सुटी घेऊ शकतील. त्यांचे काम समाधानकारक असेल तर त्यांना पुन्हा आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ दिली जाईल. मात्र, ५ वर्षापेक्षा अधिक काळ त्यांना सेवा करता येणार नाही.