नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहेत. यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्प केवळ डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. अँड्रॉईड आणि आय ओ एस प्लॅटफॉर्म्स वर युनियन बजेट या मोबाइल अॅपवरही अर्थसंकल्प पाहता येईल.
कोरोना लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अनेक विध घोषणा होण्याची चिन्हे आहेत. कृषी, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरघोस तरतूद होणे अपेक्षित आहे. विविध क्षेत्रांना आणि खासकरुन लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना व योजना अर्थसंकल्पात असतील, अशी खात्री जाणकारांनी व्यक्त केली आहे.