नवी दिल्ली – देशातील ज्येष्ठ नागरिकांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात दिलासा दिला आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना निवृत्तिवेतनाच्या उत्पन्नावरील आयकर परताव्यातून मुक्तता होणार आहे.
७५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना निवृत्तिवेतन आणि त्यावरील व्याजातून उत्पन्न मिळते. निवृत्तिवेतनातून मिळणा-या उत्पन्नावर आयकर परता वा न भरण्याचा प्रस्ताव मांडत त्यांनी देशातल्या ज्येष्ठांना नमन केले. या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही.
कर थकलेल्यांना आयकर परतावा भरण्यासाठीची कालमर्यादा ६ वर्षांवरून ३ वर्षांवर आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक करचोरी झाली असेल, तर कालमर्यादा दहा वर्षे कायम ठेवण्यात आली आहे. करासंदर्भातील प्रकरण लवकर मार्गी लावण्यासाठी विवाद से विश्वास ही योजना सुरू असून, त्याअंतर्गत एक लाखांहून अधिक करदात्यांनी प्रकरणं मार्गी लावली आहे, असेही अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं.