नाशिक – जगात दुसऱ्या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाऱ्या आपल्या देशात कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी करून दरवर्षी देशातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या केंद्र सरकारने कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्यानंतर कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासाठी विशेष तरतूद करण्याची गरज होती. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना दुर्लक्षितच केले असल्याचे राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.