नाशिक – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी केलेल्या घोषणा व तरतूदी लोकसभेत सांगितल्या. भाषणास सुरुवात करतांना अर्थमंत्री सीतारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये सहा प्रमुख स्तंभ असल्याचे नमुद केले. त्यात आरोग्य आणि कल्याण, भौतिक आणि आर्थिक भांडवल, आकांक्षी भारतासाठी समावेशी विकास, अर्थिक क्षेत्रात नवजीवन, नवप्रवर्तन आणि विकास, मिनिमम गव्हर्मेन्ट अॅण्ड मॅक्सिमम गव्हर्नन्स या गोष्टी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
- विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांपर्यंत परदेशी गुंतवणूक करता येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आतापर्यंत ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीची मंजुरी देण्यात आली होती.
- सार्वजनिक वाहतुकीमधील बसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयाची मोठी घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे .आता मेट्रो लाईट आणण्यासाठी भर दिला जाणार आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार
- निवडणूक असलेल्या राज्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. त्यात मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरोडोअरची घोषणा आहे.
- पश्चिम बंगालमध्येही कोलकाता-सिलीगुडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
- तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी १.०३ कोटीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे केरळमध्येही ६५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग बनवण्याची घोषणा केली आहे.
- आसाममध्ये पुढील तीन वर्षात हायवे आणि इकॉनॉमिक कॉरिडोर बनवणार असल्याचे अर्थमंत्री सीतामण यांनी सांगितले.
- देशात ७ टेक्स्टाईल पार्क बनवण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
- राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १.१० लाख कोटी रुपयांचा बजेट रेल्वेसाठी असल्याचेही त्या म्हणाल्या.
- भारत माला प्रोजेक्टंमध्ये १३ हजार किमीचे रस्ते
– ३८०० किमीचे रस्ते पूर्ण केले आहेत. मार्च २०२२ पर्यंत आणखी ८५०० किमीचे रस्ते पूर्ण करणार - जल जीवन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटी रुपयांची तरतूद
- स्वच्छ अर्बन मिशनसाठी १.४१ लाख कोटी रुपयांची तरतूद
– आर्थिक संस्थांसाठी २० हजार कोटी रुपये बाजूला काढले. - आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदी
– कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद
– आरोग्य़ क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद
– आरोग्य योजनांसाठी ६४ हजार कोटींची तरतूद
– देशात १५ नवे आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटल्स घोषणाही
– देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात इन्टिग्रेटेड लॅब स्थापण करणार
-. देशातल्या ११२ जिल्ह्यात मिशन पोषण योजना राबवणार -
भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा ‘एअर इंडिया’चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा
-
पेन्शन हीच मिळकत असणाऱ्यांना आयटी रिटर्न फाईल करण्याची आवश्यकता नाही
-
गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय, डिव्हिडन्टमधून मिळणाऱ्या उत्पनावरच्या करात कपात
-
पहिले मानवरहित गगनयान मिशन डिसेंबर २०२१ मध्ये होणार लॉंच
-
उज्ज्वला योजनेचा आणखी १ कोटी लाभार्थ्यांना लाभ देणार.
– -
तामिळनाडूमध्ये बहुउद्देशीय सी-वीड फार्मिंग होणार
-
गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींची मदत
-
स्वामित्व योजनेअंतर्गत आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार
-
कोरोनामुळे सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हान, सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज