नवी दिल्ली – ई-मोबिलिटीद्वारे ग्रामीण वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयांतर्गत कार्यरत कॉमन सर्व्हिस सेंटरने पुढच्या आर्थिक वर्षात दहा हजार ठिकाणी ई-मोबिलिटी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या, शंभर ठिकाणी याची सुरूवात करण्यात आली असून या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटी आणि बाईकसह ई-रिक्षांची विक्री होईल.
वाहने भाड्याने मिळणार :
इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी बनविणार्या कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत. या बँकांसोबतच खेड्यातच ग्रामस्थांना कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आला आहे.
खेड्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न :
सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी म्हणाले की, ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करणे, खेड्यांमधील विद्युत वाहनांना प्रोत्साहित करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. खेड्यांमधील सार्वजनिक वाहनेही दिवसातून एक किंवा दोनदा जातात आणि गावेही महामार्गापासून दूर आहेत.
