नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना नववर्षाची मोठी भेट दिली आहे. येत्या १ जेनावारीपासून कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. देशांतर्गत कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली होती. राजधानी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि देशांतर्गत कांद्याची उपलब्धता लक्षात घेता सरकारने आता निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, येत्या काळात कांद्याचे दरही वाढून उत्पादकांना चांगला दाम मिळणार आहे.