नाशिक – देवळालीसह देशभरातील ५६ कॅन्टोमेंट बोर्डावर सध्या वेरिड बोर्ड असून या बोर्डावर जनतेचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी संरक्षण विभागाच्या वरीष्ठ कार्यलयाकडून सर्व कमांड कार्यालये यांना कायद्याच्या चौकटीत १९ मार्च पर्यंत नाव पाठविण्यासाठी आदेश पारित केले आहेत. त्यामुळे देवळालीतील इच्छुकच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
रक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे डिजीडीई कार्यालय यांनी ३ मार्चचे आदेशानुसार देशभरातील सर्व कमांड कार्यालय यांना आदेशीत करताना या कार्यलयाचे ८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात आलेल्या वेरिड बोर्डावर ब्रिगेडीयर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकार यांचे वतीने नेमण्यात येणाऱ्या व्यक्तींचे नाव पाठवणेसाठी कॅन्टोमेंट कायदा २००६ चे कलम13(2) (सी) अनुसार आदेश काढले आहेत, मात्र सदर व्यक्ती ही सरकारी कर्मचारी असता कामा नये, अशा सूचना दिलेल्या आहेत त्या नुसार प्रत्येक कमांड मधील कॅन्टोमेंट बोर्डाचे वेरीड बोर्डाचे सदस्य ब्रिगेडीयर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३ नावाची शिफारस करावयाची आहे, सदर नावाचा प्रस्ताव प्रिन्सिपल डायरेक्टर यांचे सह जीओसी इन चिफ यांचे शिफारशी सह रक्षा मंत्रालय यांचेकडे १९ मार्च पर्यंत सादर करावयाचा आहे, त्यामूळे प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत.