नाशिक – अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (कॅट) उपाध्यक्षपदी नाशिक सराफ असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष मेहूल थोरात यांची निवड झाली आहे. देशभरातील व्यापाऱ्यांचे सर्वोच्च संघटन असलेली ही संस्था आहे. कॅटचे राष्ट्रीय महासरचिटणीस प्रवीण खंडेलवाल व राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया यांनी थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. देशांतील व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी व ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यासाठी कटीबध्द असलेल्या व्यापाऱ्यांची ही सर्वोच्च संघटना आहे. राज्य उपाध्यक्षपद थोरात यांची निवड झाल्याने एआयजीजेएफचे प्रमुख नितीन केडीया, कॅटचे महाराष्ट्र सेक्रेटरी महेश बखिया यांच्यासह नाशिकच्या व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.