मुंबई – कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅग’च्या अहवालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘कॅग’चा अहवालही सांगतो की, भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही ‘मुंगेरीलाल के हँसीन सपने’सारखीच ठरली आहे. विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार नाही यात मोठा भ्रष्टाचार आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो. मात्र जाहिरातीच्या जोरावर खोटा प्रचार केला जात होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.