नवी दिल्ली – कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणा-या कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विषयक विधेयकांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. ही कृषी विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाजी बहुमतानं संमत करण्यात आली होती. त्यामुळे या विधेयकांचं रुपांतर आता कायद्यात झालं आहे. आता या कायद्याची अंमलबजावणी करायचे की नाही हा निर्णय त्या त्या राज्य सरकारांकडून घेतला जाणार आहे.