मुंबई – राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे,दादा भुसे यांनी ट्विटर वर याबाबत माहिती टाकली आहे. भुसे यांना दोन दिवसांपूर्वी मणक्यांच्या त्रास झाल्याने उपचारासाठी ते मुंबईत आले होते. यावेळी त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली त्यात ते पॅाझिटिव्ह आले.