लासलगांव – मालेगाव येथे कृषी मंत्री दादा भुसे यांची निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी शनिवारी झालेल्या वादळी पावसाने शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत निवेदन दिले. यात तात्काळ पंचनामे करण्यात यावे, पीक विम्याचे तातडीने पैसे शेतकऱ्यांना मिळावे, तसेच नुकसानीची भरपाई मिळावी ही मागणी करण्यात आली. यावेळी टाकळी विंचुर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन ईश्वर तात्या शिंदे, रविराज शिंदे, रामदास वारुळे सह शेतकरी बांधव उपस्थितीत होते.