भोपाळ – तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या व शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मध्य प्रदेश कॉंग्रेसतर्फे येत्या २७ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील रीवा येथे किसान महासंमेलन होणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यासह ज्येष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत.
कृषी कायद्याच्या विरोधातसाठी जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कृषी महासंमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी १० फेब्रुवारीपासून राज्यातील जिल्ह्यात किसान संघर्ष पदयात्रा सुरू झाली असून २० फेब्रुवारीपर्यंत सर्व जिल्ह्यात पदयात्रा पूर्ण होणार आहे. या पदयात्राबरोबरच संघटनेच्या कामकाज आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांशी संबंधित बैठकाही होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी रीवा येथे किसान महासंमेलन होणार असून त्यामध्ये पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.