नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. तसेच, चार सदस्यीय समितीही न्यायालयाने नेमल्याने पवार यांनी हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली आहे. यासंदर्भात पवार यांनी ट्वीट करुन त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. यानिमित्ताने शेतकरी आणि सरकार यांच्यातील बोलणी होतील आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1348943742506397702