मुंबई – क्रिकेटपटू कृणाल पांड्याला त्याची हौस चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. इंडियन प्रिमिअर लीग संपल्यानंतर दुबईहून भारतात परतताना पांड्याला विमानतळावर थांबविण्यात आले. त्याच्याकडून महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. आता ही घड्याळे जर पांड्याला हवी असतील तर त्याला किती कर भरावा लागेल याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्याला लाखो रुपयांचा कर भरावा लागू शकतो. पांड्या व त्याच्या पत्नीकडे सोन्याच्या चैनसह डायमंडची दोन आणि रोलेक्स मॉडेलची दोन अशी ४ महागडी घड्याळे सापडली. त्याची माहिती त्याने कस्मला दिली नाही. या घड्याळांची किंमत १ लाखाच्या आसपास आहे. त्याला या घड्याळांसाठी कस्टम ड्युटी आणि दंड भरावा लागणार आहे. महागड्या आणि लक्झरी आयात वस्तूंवर ३८.५ टक्के कर आहे. म्हणजेच ३८ लाख हा कर आणि त्यावर दंड असे त्याला जवळपास ५० लाख रुपये भरावे लागू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.