रोहतक (हरियाणा) – शहरातील एका कुस्ती आखाड्यात अचानक गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली. जाट कॉलेजजवळच्या एका आखाड्यात गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन कुस्ती प्रशिक्षक आणि एक महिला पहिलवानाचा समावेश आहे. महिला पहिलवान उत्तर प्रदेशमधल्या मथुराची असल्याचं सांगतिलं जात आहे. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशिक्षक सुखवेंद्र मोर यानं आपल्या सहकार्यांसह हा गोळीबार केला आहे.
आखाड्याचे मुख्य प्रशिक्षक मनोज मलिक यांच्यासोबत सुखवेंद्र मोरचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
जाट कॉलेजजवळ शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) रात्री एका आखाड्यात कुस्तीचे प्रशिक्षकानं गोळीबार केला. त्यामध्ये आखाडा संचालक आणि त्यांची पत्नीसह पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राहुल शर्मा आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.









