नवी दिल्ली – इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व जेवढ्या उत्तम पद्धतिने केले, तेवढ्याच वाईट पद्धतिने ते पाकिस्तानचे नेतृत्व करीत आहेत. अद्याप त्यांना क्रिकेट खेळणे आणि देश चालविणे यातील फरक कळलेला नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्रालाही इम्रान यांनी तिरकस उत्तर दिले आहे.
इम्रान खान यांना ‘पाकिस्तान दिवसा‘च्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहीले. या पत्राचे उत्तर आले असून यात इम्रान यांनी आपण कुत्र्याचे शेपूट असल्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
जम्मू–काश्मीरची समस्या सोडविल्याशिवाय दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे पत्रात लिहून इम्रान यांनी फार मोठी चूक केली आहे. चार दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लशीसाठी भारताचे हात–पाय पकडणाऱ्या पाकिस्तानची ही भूमिका त्यांच्या अंगलटी येऊ शकते, याची इम्रान यांना कल्पनाच नाही. इम्रान एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी आणखी बऱ्याच गोष्टी इशाऱ्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जम्मू–काश्मीरचा प्रश्न
भारतासाठी जम्मू–काश्मीरचा प्रश्न सुटला आहे, याची इद्याप इम्रान यांना कल्पनाच नाही. त्यामुळेच त्यांनी दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत–पाकिस्तान यांच्यातील जम्मू–काश्मीरचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे, असे पत्रात आवर्जून नमूद केले आहे. पत्राची सुरुवात धन्यवादाने झाली असली तरीही पत्राच्या आत इम्रान यांनी आपल्या अकलेचे तारे तोडल्यामुळे पाकिस्तानची वृत्ती स्पष्ट होते.
मोदींच्या पत्रात काय होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहीले. या पत्रात पाकिस्तान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय एक शेजारी राष्ट्र म्हणून सौहार्दपूर्ण संबंधांची अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.