मुंबई – ‘कुणी आपल्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सीडी लावू’ असा स्पष्ट इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करताना दिला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. यात ते म्हणाले की, आपण ज्या वेळेला भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश याचा विचार केला त्या वेळेला जयंत पाटील यांनी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. ‘कुणी तरी तुमच्या मागे ईडी चौकशीचे नाटक लागेल’ असे ते म्हणाले. यावर खडसे म्हणाले की, ‘कुणीतरी ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सीडी लावू’. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये आपण ४० वर्षे संघर्ष केला आपला संघर्ष हा कधी कुणापासून लपून राहिलेल्या नाही खरं तर संघर्ष हा आपला मूळ स्वभाव असल्याचे त्यांनी याप्रसंगी ठासून सांगितले. आपण कधीही महिलेला समोर करून राजकारण केले नाही. मात्र मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपण जनतेची सेवा करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.