नवी दिल्ली – कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कुणाल कामरा यांच्याविरोधात यापूर्वीच अवमान खटला चालू आहेत. आता दुसऱ्या एका ट्विटसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. त्यासाठी अॅटर्नी जनरल यांनी मंजुरी दिली आहे. कामरा यांनी आपल्या ट्विटमध्ये मिडल फिंगरच्या माध्यमातून मुख्य न्यायाधीशांविषयी अवमानकारक हावभाव केला होता.
कुणाल कामराविरोधात यापूर्वीच अवमानाचा खटला चालू आहे. अटॉर्नी जनरल यांनी गेल्या आठवड्यात कामरा यांच्याविरोधात अवमान कार्यवाही सुरू करण्यास मान्यता दिली होती. कामराने या आधीच्या ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. अॅटर्नी जनरल म्हणाले होते की, हा प्रकार निंदनीय आहे आणि आता अशी वेळ आली आहे की, त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली तर त्यांना शिक्षा होईल.
एखाद्या व्यक्तीविरूद्ध अवमान कार्यवाही सुरू करण्यासाठी न्यायालयीन निषेध कायद्याच्या अंतर्गत अॅटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरलची मान्यता अनिवार्य आहे. प्रयागराज स्थित वकील अनुज सिंग यांनी या संदर्भात केलेल्या विनंतीला वेणुगोपाल यांनी नवीन मान्यता दिली. कामरा यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी आपल्या ट्विटमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या विरोधात भाष्य करताना आक्षेपार्ह हावभाव दर्शवले होते.
अॅटॉर्नी जनरल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, दि.18 नोव्हेंबर (सकाळी 9.00 वाजता) च्या ट्विटच्या संदर्भात कुणाल कामरा यांच्याविरोधात न्यायालयीन निषेध अधिनियम 1971 च्या कलम 15 अंतर्गत मंजुरीसाठी केलेली विनंती मी पाहिली आहे. तसेच ते म्हणाले की, ते ट्वीट अत्यंत उद्धट आणि चुकीचे आहे.