मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय केला जाणार नाही किंवा कुठल्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधीमंडळात चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधकांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार केला जात आहे. राजकारण केले जात आहे, ही बाब योग्य नाही. मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वकीलांची मोठी फौज आपण तयार केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात नक्की टिकेल, अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.