नवी दिल्ली – भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसींना मान्यता मिळाली आहे. मात्र, या दोन्ही लसींपैकी कुठली घ्यायची याचा पर्याय नागरिकांना असेल का, याचा मोठा खुलासा झाला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी आज पकार परिषदेत लसीकरणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अनेक देशांमध्ये एकापेक्षा अधिक लस वापरल्या जात आहेत. मात्र, तेथे असा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही की नागरिकांनी लसीची निवड करावी. त्यामुळे भारतातही लस निवडीची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्हीही लस सुरक्षित असून शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण होईल, असे भुषण यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1348954037685690368
https://twitter.com/ANI/status/1348953726979952643