अहमदाबाद – भावनगरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांची एकाचवेळी सर्जरी झाली आहे. देशतील हे दुर्मिळ उदाहरण आहे. कारण, एकाचवेळी कुटुंबातील १ किंवा २ जणांची सर्जरी होऊ शकते. पण, थेट सातही जणांची सर्जरी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचे कारण आहे, लठ्ठपणाचा अनुवांशिक आजार.
भावनगरमधील एका कुटुंबात लठ्ठपणाचा अनुवांशिक आजार असल्याने त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत त्यांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा सहारा घ्यावा लागला. कारण त्यांना मधुमेह आणि यकृत सिरोसिस सारख्या गंभीर आजारांनी वेढले होते.
अहमदाबादच्या एशियन बॅरियट्रिक्स रुग्णालयात प्रसिद्ध सर्जन डॉ. महेंद्र नरवरिया यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे यांनी एकाच दिवसात या सात जणांवर शस्त्रक्रिया केली. देशातील कदाचित ही पहिली घटना असून एकाच कुटुंबातील सात सदस्यांवर २४ तासांच्या आत एकाच रुग्णालयात ही शस्त्रक्रीया झाली. त्यानंतर सर्व लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून आता ते सर्वजण बरे आहेत.