नाशिक: दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०२० पासून देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तीन कृषी कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० रद्द करावा. स्वामिनाथन आयोग शिफारशी लागू करा. शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. २६ मार्चला चार महिने आंदोलनला पूर्ण होत आहेत. भारत किसान मोर्चाने या पार्श्वभूमीवर देशव्यापी २६ मार्चला भारत बंदचे आवाहन केले आहे. भारत बंद ला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, सहभारतीय कम्युनिस्ट पक्ष व देशभरातील अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रत कार्यरत २०० पेक्षा अधिक शेतकरी, कामगार, संस्था, संघटना एकत्र असलेल्या जनआंदोलनची संघर्ष समिती भारत बंद यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात भारत बंद यशस्वी करावा. शेतकरी, कामगार, व्यापारी सर्वानी सहभागी होऊन बळीराजाला साथ द्यावी . केंद्र सरकार कोरोना काळात शेतकरी , कामगार, व्यापारी विरोधी कायदे केले आहेत. बँक, एल आय सी, रेल्वे खाजगीकरण करून विक्री करत आहे याचा निषेध करण्यासाठी भारत बंद यशस्वी करावा. तसेच देशभर २८ मार्चला होळी च्या दिवशी शेतकरी विरोधी कायदे, प्रस्तवित वीज बिल कायदाची होळी करण्यात येणार आहे. तरी गावागावात होळी करावी असे आवाहन किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्लाध्यक्ष भास्कर शिंदे, सरचिटणीस देविदास बोपळे, जिल्हा संघटक विजय दराडे, उपाध्यक्ष अॅड दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोराडे, कार्याध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, सुखदेव केदारे, मधुकर मुठाल, किरण डावखर, रमजान पठाण, वित्तल घुले, साधना गायकवाड, शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, जगन माळी, शिवाजी पगारे, नामदेव राक्षे, बरहे, विष्णू रण आदींनी केले आहे.