मनमाड – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या प्रयत्नातून शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या किसान रेल मधून जाणाऱ्या शेतमालाची खासदार डॉ.भारती पवार यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी किसान रेल्वेला नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शेतकरी व व्यापाऱ्यांचा शेतमाल दुसऱ्या राज्याच्या बाजार पेठेत पोहचविण्यासाठी हे एकमेव उत्तम साधन असल्याने शेतकरी व्यापारी समाधानी आहे.