चांदवड – केंद्रशासनाच्या उद्योजकता विकास उपक्रमाच्या माध्यमांतुन दुगाव ता.चांदवड येथे किसान पुरी ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन खा.डॉ.भारती पवारांच्या हस्ते करण्यात आले. या सेवा केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील ग्राहकांना विविध शासकीय उपक्रमांची माहिती देऊन विविध छोटे मोठे उद्योग उभारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बँकिंग सुविधा, शैक्षणिक सुविधा, पॅनकार्ड आधारकार्ड, विजबिल भरणा, शासकीय दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठीची सेवा दिली जाणार असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून गीर गाईंचे देखील वाटप नियमानुसार केले जाणार असून त्या गाईंचे दूध, शेण, गोमूत्र संकलन केले जाणार असून याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी याप्रसंगी केले.