नाशिक : मित्रांना खासगी बोलायचे असल्याने दूर थांब असे सांगितल्याचा राग आल्याने एकाने युवकावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी (दि.२७) रात्री पंचक, जेलरोड येथे घडली.
मोहन बंडू यंडाईत (रा. पंचक गाव, जेलरोड) असे हल्ला करणार्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गणपत रमेश कुशारे (रा. पंचक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री सोडआठ वाजेच्या सुमारास कुशारे हे मित्रांसमवेत घराजळ बोलत उभे असताना यंडाईत त्या ठिकाणी आला. आम्ही मित्र खासगी बोलत असल्याने थोडावेळ दूर उभा रहा असे सांगितल्याचा राग यंडाईत यास आला. त्यावेळी तो तेथून निघून गेला मात्र यानंतर कुशारे हे आईसह दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना आडवून यंडाईत याने कुशारे यांच्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एस.वी. चौधरी करत आहेत.