मुंबई – काही विशिष्ट काळापर्यंत वापर केल्यानंतर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्स स्लो होऊन जातात. अशावेळी फोन मधील स्टोरेज रिकामे करणे, किंवा काही अॅप्स काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे अनेकदा आपल्याला फोनमधील फाइल्स डिलीट कराव्या लागतात. सोबतच इच्छा नसताना देखील काही अॅप्स फोन मधून काढून टाकावे लागतात. मात्र एक अशी युक्ती आहे ज्यामुळे फोन सुपर फास्ट होऊ शकतो. आणि त्यासाठी कोणताही डेटा किंवा अॅप्स डिलीट करायची गरज नाही. बस यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये काही बदल करायचे आहेत.
सेटिंग मध्ये करा हे बदल…
सर्वप्रथम फोनच्या सेटिंग मध्ये जा. येथे खालच्या बाजूला सिस्टम सेटिंग हे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. काही फोन्समध्ये तर सिस्टम सेटिंग या ऑप्शनमध्ये सुद्धा जायची गरज नसते. सरळ तुम्हाला अबाउट फोन हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावार बिल्ट नंबरचा ऑप्शन दिसून येईल. या ऑप्शनवर तुम्हाला वारंवार अनेकदा क्लीक करावे लागेल. यानंतर तुमच्यासाठी डेव्हलपर्स ऑप्शन खुले होतील. यानंतर सेटिंग मध्ये परत जा. आता आपल्याला डेव्हलपर्स ऑप्शन दिसायला लागतील. यावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील. यापैकी Window Animation Scale नावाचे ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर बरेच अॅनिमेशन स्केल्स दिसतील. यापैकी Animation Scale.5x हे ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे. यानंतर तुमचा फोन सुपरफास्ट होईल.
जर तुम्हाला आधीसारखीच स्पीड परत हवी असेल, तर याच पद्धतीने सेटिंग ऑप्शनमध्ये जाऊन आता उपलब्ध असलेल्या डेव्हलपर्स ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा Window Animation Scale ऑप्शनमध्ये जाऊन Animation Scale.1x हा पर्याय निवडावा लागेल
काय असते Window Animation
Window Animation ऑप्शन हे एक डेव्हलपर्स ऑप्शन आहे ज्याचा वापर फोनचे डिझाईनर्स फोन डेव्हलप करताना करत असतात. फोनची सर्वाधिक स्पीड वर टेस्ट झाल्यानंतर डेव्हलपर्स त्याला एका मध्यम गतीवर म्हणजेच Animation Scale.1x वर स्थिर करून ठेवतात. यामुळे ग्राफिक्स अधिक डीटेल्स मध्ये आणि अधिक जास्त वेळ पर्यंत दिसू शकतात. मात्र फोन स्लो झाल्यास Animation Scale.5x हा पर्याय निवडून आपण फोनची स्पीड वाढवू शकतो.