नवी दिल्ली – काश्मीर प्रश्नावरून भारतविरोधी भूमिका घेत असलेल्या तुर्कीविरूद्ध भारताने राजनैतिक मोर्चेबांधणी करत आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरूद्ध तुर्की आणि पाकिस्तानच्या मोहिमेनंतर भारताने दहशतवादाच्या मुद्यावर फ्रान्सचे जोरदार समर्थन केले. तुर्की आणि ग्रीस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात भारताने ग्रीससोबत चर्चा केली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांशी परस्पर सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.
भारत आपल्या हितसंबंधांच्या दृष्टीने मुत्सद्दीपणे चर्चा करत आहे. फ्रान्समधील दहशतवादी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटशिवाय भारताने फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर वैयक्तिक हल्ल्याला विरोध दर्शविणारे अधिकृत निवेदन दिले. यानंतर, अनेक इस्लामिक संघटना आणि देश अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा तीव्र विरोध करत असूनही भारताने परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांना फ्रान्सच्या दौऱ्यावर पाठविले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे फ्रान्सची मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रत्येकवेळी मोर्चेबांधणीला फ्रान्सने भारताला पाठिंबा दिला आहे. चीनच्या सीमाप्रश्नावरून तसेच पाकिस्तान विरोधी भारताच्या भमिकेला फ्रान्सने नेहमी समर्थन दर्शवले आहे. यावेळी भारताने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते आहे. एकीकडे काश्मीर प्रश्नावर प्रभावशाली देशांना पटवून देण्यात भारत यशस्वी झाला आहे. त्याचबरोबर विरोधी देशांकडूनही तंतोतंत मुत्सद्दीपणाला प्रतिसाद दिला जात आहे. भारत लवकरच हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात सुरू करणार आहे.