घोटी – जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी करण्यात आली असून या बाबत शासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, तालुका आरोग्य विभाग व घोटी पोलिसांना याबाबत सूचना देखील करण्यात आल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना दोन्ही धार्मिक स्थळी येण्यास बंदी असणार आहेत त्याचप्रमाणे फराळ वाटप, पूजा विधी हे कार्यक्रम देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाने व्यापारी व स्थानिक नागरिकांना आपआपली दुकाने बंद करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
दरम्यान सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी येथील यात्रा उत्सवात गर्दी होऊ नाही यासाठी पत्र देखील संबंधित यंत्रणेला पाठवले आहे. याआधी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण व ग्रामीण पोलीस उपअधीक्षक डॉ अर्जुन भोसले,घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे,सर्वतीर्थ टाकेद संस्थानचे अँड महंत श्री किशोरदास श्रीवैष्णव, महंत फलहारी महाराज, महंत उडिया महाराज कावनईचे ट्रष्टी कुलदीप चौधरी यांनी व स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन यात्राउत्सव बंद करण्याचा निर्णय देखील घेतला होता ११ मार्चला असणाऱ्या महाशिवरात्री निमित्ताने कोरोनाच्या वाढत्या संक्रमण नियोजन बैठक पार पडली. या बैठकित १० मार्च पासून ते १३ मार्च पर्यंत टाकेद तीर्थ पूर्णपणे मंदिरांसह बंद राहणार असून या पाच दिवस टाकेद तीर्थावर स्थानिक ग्रामपंचायत, मंदिर संस्थान,पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे.या संचारबंदी कालावधीत टाकेद तीर्थ क्षेत्री कोणताही भाविक भक्तगण,व्यवसायिक,यात्रेकरू,दुकानदार,स्टॉल विक्रेते टाकेद तीर्थावर येणार नाही.येत्या बुधवार पासून कावनई व टाकेद तीर्थ क्षेत्र हे पूर्णपणे बंद असणार आहे.संचार बंदी कालावधीत तिर्थक्षेत्रावर कोणीही येणार नाही. नियम तोडून कोणी गैरवर्तन केल्यास सदर व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही देखील होइल.पाच दिवस स्थानिक ग्रामपंचायत सह पोलीस प्रशासनाचा रात्रंदिवस खडा पहारा असणार आहे.
या संचारबंदी कालावधीत महाशिवरात्री दिवशी देवदर्शनाला व यात्रेला कोणीही भाविक,व्यवसायिक, यात्रेकरू,भाविक भक्तगण,दुकानदार वर्गाने येऊ नये असे आवाहन प्रशासन, ट्रस्ट समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.