येवला – तालुक्यातील डोंगरगाव शिवारात काळविटाची शिकार होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. शेतात जाळे लावून काळविटाला डोक्यात दगड घालून त्याची निघृणपणे शिकार केल्याचे उघड झाले आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरुन मृत काळविटासह शिकाऱ्याला पडकले आहे. मात्र, शिकारीत सहभागी असलेले चार जण फरार झाले आहेत. तर, दुसऱ्या एका घटनेत रेंडाळे शिवारात सोमवारी कारच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या काळविटाचा मंगळवारी (११ ऑगस्ट) उपचार सुरू असताना मृत्यू झाला.