नाशिक – शहरात गुंडाराज पुन्हा बळावतो की काय, अशी शंका निर्माण करणारी घटना घडली आहे. ठाण्यातील कुख्यात गँगस्टर व सोशल मिडीया भाई सिद्धेश अभंगे याची नाशिकरोड कारागृहातून सुटका झाली. मात्र, त्याच्या स्वागतावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे जेलरोड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ठाणे पोलिसांनी त्याच्यावर गेल्या वर्षी स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यानंतर त्याची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाईच्या समर्थकांनी कारागृह परिसरातच स्वागत समारंभ केल्याचे पहायला मिळाले. एकप्रकारे भाई आणि त्याच्या समर्थकांनी नाशिक पोलिसांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
पहा भाईच्या स्वागताचा हा व्हिडिओ