नाशिक – पोलीसात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणातून कारमधून आलेल्या एकाने पादचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद बर्वे (नाव गाव नाही) असे चाकू हल्ला करणाºया कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर सुरेश गोमासे (२६ रा.इंदिरा शाळेजवळ,कार्बन नाका रोड,शिवाजीनगर ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोमासे मंगळवारी (दि.१५) शतपावली करीत असतांना ही घटना घडली. सातपूर येथील सगुना चिकन सेंटर समोरून गोमासे जात असतांना स्विफ्ट कारमधून आलेल्या संशयीताने त्यांच्या अंगावर वाहन घातले. यावेळी कार खाली उतरलेल्या संशयीताने साईलीला बारची केस मागे घे नाहीतर मी तुला जीवंत ठेवणार नाही असे म्हणून गोमासे यांच्या डोक्यावर चाकूने हल्ला केला मात्र गोमासे यांनी वेळीच हात आडवा केल्याने त्यांच्या हातास दुखापत झाली असून अधिक तपास हवालदार भामरे करीत आहेत.
—
रिक्षाची चाके चोरी करुन चोरट्यांकडून दमदाटी
नाशिक – पार्क केलेल्या अॅटोरिक्षाची तिन्ही चाके चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना भारतनगर भागात घडली. याबाबत रिक्षाचालकांने चोरट्या संशयीतांशी संपर्क साधला असता त्यांनी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजू काझी व अलिम उर्फ आल्या तसेच त्यांचे दोन साथीदार (रा.सर्व भारत नगर) अशी संशयीतांची नावे आहे. प्रमोद शिवाजी सोनकांबळे (रा.गोदावरीनगर,अशोक स्तंभ) यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. सोनकांबळे यांची अॅटोरिक्षा एमएच १५ ईएच ०२३७ रविवारी (दि.१३) रात्री छोटा अंजूमन याच्या घराच्या पाठीमागील गल्लीत पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी अॅटोरिक्षाचे डिक्ससह तीन चाके आणि ब्ल्यू ट्यूथ कनेक्टेड टेप असा ऐवज चोरून नेला. या चोरी बाबत तक्रारदार सोनकांबळे यांनी परिसरात राहणाºया संशयीतांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांनी दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
—
दुचाकीसह सायकलची चोरी
नाशिक – शहरात वाहनचोरीच्या घडना वाढल्या असून पार्क केलेल्या एका दुचाकीसह चोरट्यांनी सायकल चोरून नेली. या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प भागातील प्रशांत भास्कर केदारे (४५ रा.जुनी स्टेशनवाडी) यांची शाईन मोटारसायकल (एमएच १५ ईडब्ल्यू ५८४२) दि.५ ऑगस्ट रोजी परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याजवळ पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत. दुसरी घटना यशवंत व्यायाम शाळा भागात घडली. राहूल कारभारी सोनवणे (रा.गोविंदनगर) हे गेल्या शनिवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे यशवंत व्यायाम शाळेत गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची १५ हजार रूपये किमतीची सायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
—
चुंचाळे भागात एकाची आत्महत्या
नाशिक – चुंचाळे शिवारातील जवाहरलाल नागरी घरकुल योजनेत राहणाºया ४५ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत कारभारी पारखे (रा.जवाहरलाल नागरी घरकुल योजना,चुंचाळे) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. पारखे यांनी मंगळवारी (दि.१५) सायंकाळी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.