नवी दिल्ली – कारगिल युद्धाबाबत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना असे वाटत होते की, पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख नवाज शरीफ यांनी आपला विश्वासघात केला आहे. कारण भारत-पाकिस्तानमधील युध्दाचा तणाव संपुष्टात आणण्यासाठी वाजपेयी यांनी शरीफांशी त्यावेळी फोनवर चार-पाच वेळा चर्चा केली होती.
स्व. वाजपेयी यांच्या समवेत अनेक वर्षांपासून खासगी सचिव असलेल्या शक्ति सिन्हा यांच्या ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज इंडिया’ या नव्या पुस्तकात याचा हा खुलासा करण्यात आला आहे. आता त्यांचे हे पुस्तक वाजपेयी यांच्या जयंती दिनी २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्याबरोबर पीएमओ कार्यालयासह खासगी सचिव म्हणून अनेक वर्षे काम केले. तसेच सिन्हा सध्या एमएस युनिव्हर्सिटी, वडोदरा येथील अटलबिहारी वाजपेयी पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनल स्टडीज इन्स्टिट्यूट ऑफ मानद संचालक आहेत.
सिन्हा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, आज वाजपेयी यांचे नेहमी स्मरण केले जाते, परंतु १९९८ मध्ये सरकार स्थापण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला हे लोकांना माहिती नाही. असे असूनही त्यांनी अण्वस्त्र चाचण्या घेण्यात आणि पाकिस्तानला मदतीचा हात देण्याचे कठीण निर्णय घेतले. या मुद्द्यांवर त्यांनी जोरदारपणे भारताचा बचाव केला. मात्र त्यानंतर कारगिल युद्ध सुरू झाले. त्यांच्याच सरकारमध्ये त्यांना काही विरोधकांचा सामना करावा लागला.
उदात्त हेतू असलेले महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी उभारले. तसेच दोन काळातील अल्पकालीन आणि एकदा पूर्णवेळ पंतप्रधान असलेले वाजपेयी संवेदनशील कवी होते. त्यांनी उच्च उद्देशाने पोखरण अण्वस्त्र चाचणी घेतली आणि गोल्डन चतुष्कोन योजनेसारख्या महत्वाकांक्षी रोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यांच्या अनेक ठोस निर्णयांमुळे धोरणात्मक आणि आर्थिक धोरणांमध्ये बर्याच अंशी यश मिळाले. अशी अनेक गोष्टी या पुस्तकांत नमुद केल्या असून त्यांच्या ३०० पानांच्या पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत.