जोहान्सबर्ग – कोरोनाचा कहर अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यातच आलेली दुसरी लाट अनेक देशांना हादरवून सोडते आहे. याहूनही दुर्दैवी म्हणजे कोरोनाच्या संकटात मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट्टेल तेवढी रक्कम मागितली जात आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या हा प्रकार घडतो आहे.
डर्बन येथील हिंदू धर्म असोसिएशनचे सदस्य प्रदीप रामलाल यांनी ही माहिती दिली. येथे अनेक गुरुजी असे आहेत जे अंत्यसंस्कार करण्यासाठी ७९ ते १३१ डॉलर्स मागतात. हे चुकीचे आहे. कारण अंत्यसंस्कार करणे म्हणजे माणुसकीचा धर्म पाळणे. त्यामुळे त्याची किंमत ठरवणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. कोणी स्वेच्छेने दिल्यास ती गोष्ट वेगळी आहे. पण अशा तऱ्हेने पैसे मागणे, तेही संकटाच्या काळात हे योग्य नाही, असे रामलाल यांचे म्हणणे आहे. डर्बनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. त्यांच्याकडून आम्हाला अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लहर आल्यानंतर येथे मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत.