मुंबई : तातडीच्या काही कामासाठी प्रोव्हिडेंट फंड (पीएफ) काढायचा असतो, पण नेमका त्यासाठी आवश्यक असलेला यूएएन नंबरच आठवत नाही किंवा मिळत नाही. मग अडचण निर्माण होते. पण आज आम्ही यूएएन नंबरशिवायही पीएफ बॅलन्स कसा पाहतात आणि पीएफ कसा काढतात, हे सांगणार आहोत.
असा करा बॅलन्स चेक
1. सर्वप्रथम epfindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा.
2. ‘Click here to know your EPF balance’ यावर क्लिक करा.
3. मग तुम्ही epfoservices.in/epfo/ या पेजवर जाल. तेथे ‘Membar Balance Information’वर क्लिक करा.
4. आता तुम्हाला तुमचे राज्य निवडून आपल्या ईपीएफओ ऑफिसच्या लिंकवर क्लिक करा.
5. तिथे गेल्यावर आपला पीएफ अकाऊंट नंबर, नाव आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका. सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स बघता येईल.
असा काढा पीएफ?
तुमच्याकडे यूएएन नंबर नसेल तर पीएफ काढण्यासाठी तुम्हाला पीएफ withdrawl फॉर्म भरावा लागेल. तो तुम्ही स्थानिक पीएफ कार्यालयात जमा करा. ईपीएफ सदस्यांना यासाठी आधार बेस्ड क्लेम फॉर्म किंवा नॉन आधार क्लेम फॉर्म डाऊनलोड करावा लागतो. हा फॉर्म भरून तुम्ही पूर्ण किंवा थोडा पीएफ काढू शकता.
यूएएन नंबर म्हणजे काय?
यूएएन म्हणजे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर हा १२ अंकी असतो. हा नंबर मरेपर्यंत एकाच असतो. नोकरी बदलली तरी हा नंबर कधीही बदलत नाही. तुमच्या सगळ्यात पहिल्या नोकरीच्यावेळी हा नंबर तुम्हाला कंपनीकडून दिला जातो. या नंबरच्या मदतीने तुम्हाला पीएफ काढणं सोयीचं होतं.