नवी दिल्ली – आपला भारत देश रहस्यमय घटनांनी भरलेला आहे. येथे अशी माहिती पदोपदी सापडते. त्यामुळे विश्वास ठेवणे थोडे कठीण होते. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे असून त्यातील काही रहस्यमय आहेत. आपण आता आश्चर्यकारक शक्ती असलेल्या मंदिराबद्दल जाणून घेऊ जे मंदिर चक्क सर्वात मोठ्या जहाजाला आपल्याकडे देखील खेचून घेत होते.
कोणार्कचे सूर्यमंदिर हे भारतातील काही सूर्यमंदिरांपैकी एक असून ते ओडिसातील जगन्नाथ पुरीच्या ईशान्य पूर्वेस ३५ किलोमीटर अंतरावर कोणार्क शहरात आहे. कोणार्कचे मंदिर हे पुराणकथा आणि श्रद्धा यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
यासह इतरही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे भाविक हे मंदिर पाहण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून येतात. तसेच ओडिशामधील मध्ययुगीन वास्तुकलेचा तो एक अनोखा नमुना आहे. म्हणूनच १९८४ मध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले.










