रायपूर (छत्तीसगड) – एखाद्या लहान मुलाची बुध्दी तेज असेल तर आपण म्हणतो की, तो खुप शॉर्प किंवा हुशार असून तो अभ्यासात दहावीच्या मुलांनाही मागे टाकेल. छत्तीसगडमधील ११ वर्षीय लिव्हजोतसिंग अरोराच्या बाबतीत देखील असेच म्हणता येईल, कारण लिवजोत सध्या पाचवीत शिकत असतानाही, त्याला दहावीच्या परीक्षेस परवानगी देण्यात आली आहे.
लिवजोत यांची स्मरणशक्ती व हुशारी इतकी तीव्र आहे की, छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाने ही परवानगी दिली असून या राज्यातले असे पहिलेच उदाहरण मानले जाते.
केवळ ११ वर्षाच्या लिवजोतसिंग अरोराचा आयक्यू १६ वर्षांच्या किशोरवयीन समतुल्य आहे. शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार लिवजोतने दहावीच्या परीक्षेला बसण्यास परवानगी मागितली होती. त्यानंतर त्यांची दुर्ग जिल्हा रुग्णालयात आयक्यू चाचणी घेण्यात आली.
तपासणीत लिवजोतचा आयक्यू पातळी १६ वर्षांच्या किशोरांच्या तुलनेत आढळली मानवी बुद्धिमत्ता ही आयक्यू पातळीवरून मोजली जाते. त्या आधारे छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेला बसण्यास परवानगी दिली.
लिव्हजोतच्या परीक्षेचा निकाल आणि बुद्ध्यांक अहवाल बोर्ड परीक्षा व निकाल समितीसमोर सादर करण्यात आला होता, त्यानंतरच त्याला दहावीच्या परीक्षेस बसण्याची परवानगी होती. लिव्हजोतचे वडील गुरविंदरसिंग म्हणाले, माझा मुलगा बालपणापासूनच खूप हुशार होता. जेव्हा तो तिसऱ्या वर्गात होता, तेव्हा त्याने गणिताचे कठीण प्रश्न काही सेकंदात सोडवले होते.